⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर..! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 400 जागांवर भरती

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर..! बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 400 जागांवर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तब्बल 400 जागांवर ही भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जुलै 2023 आहे. Bank of Maharashtra Recruitment

एकूण पदसंख्या : 400

या पदांसाठी होणार भरती?
1) ऑफिसर स्केल III 100
2) ऑफिसर स्केल II 300

शैक्षणिक पात्रता:
ऑफिसर स्केल III : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल II : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क –
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-

निवड प्रक्रिया –
निवड वैयक्तिक मुलाखत/ऑनलाइन परीक्षेव्दारे केली जाईल. उमेदवाराची पात्रता, योग्यता/अनुभव इत्यादींच्या संदर्भात पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी बँकेद्वारे अर्जांची प्राथमिक तपासणी केली जाऊ शकते. अंतिम निवड उमेदवाराने वैयक्तिक मुलाखत/ऑनलाइन परीक्षा मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. उमेदवारांच्या संख्येनुसार बँक निवडीची पद्धत बदलू शकते.

केवळ किमान पात्रता आणि अनुभवाचे निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखतीसाठी आपोआप पात्र होणार नाही. निवड/भरती प्रक्रिया इत्यादी पद्धती/निकष बदलण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

इतका पगार मिळेल?
ऑफिसर स्केल III :- 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
ऑफिसर स्केल II :- 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जुलै 2023

जाहिरात (Notification): पाहा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.