⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी भरती सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आली. या भरतीची नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली असून एकूण १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार असून ६ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Bank of Maharashtra Bharti 2023

रिक्त पदे आणि पदसंख्या:
क्रेडिट ऑफिसर स्केल II – ५० जागा
क्रेडिट ऑफिसर स्केल III – ५० जागा

शैक्षणिक पात्रता:
क्रेडिट ऑफिसर स्केल II –
कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण (राखीव प्रवर्गाला ५५ टक्के) तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी/ एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण अरणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

क्रेडिट ऑफिसर स्केल III – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण (राखीव प्रवर्गाला ५५ टक्के) तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी/ एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण अरणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.

परीक्षा शुल्क: ११८० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ११८ रुपये.

वयोमर्यादा: किमान २५ ते कमाल ३५ वर्षे
किती पगार मिळेल
क्रेडिट ऑफिसर स्केल II – ४८ हजार १७० ते ६९ हजार ८१०
क्रेडिट ऑफिसर स्केल III – ६३ हजार ८४० ते ७८ हजार २३०

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online