⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

बँकेत नोकरीची उत्तम संधी.. Bank of India मध्ये 500 पदांसाठी बंपर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) तब्बल 500 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार BOB bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. Bank of India Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव :
क्रेडिट ऑफिसर (GBO) 350 पदे
IT ऑफिसर (SPL) 150 पदे

आवश्यक पात्रता : Bank of India Bharti 2023

क्रेडिट ऑफिसर (GBO) : कोणत्याही शाखेतील पदवी.
IT ऑफिसर (SPL) : B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level

निवड प्रक्रिया :- ऑनलाइन लेखी परीक्षा, गट चर्चा, मुलाखत. या तीन टप्प्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल.
लेखी परीक्षेत, इंग्रजी भाषा, तर्क आणि संगणक अभियोग्यता, सामान्य अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता, डेटा विश्लेषण आणि व्याख्या यांतून 200 गुणांचे 155 प्रश्न विचारले जातील. पेपर १८० मिनिटांचा असेल. इंग्रजी वर्णनात्मक पेपर (पत्र लेखन आणि निबंध) 25 गुणांचा असेल. 30 मिनिटे दिली जातील.

पगार
कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल-I (JMGS I)- 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

अर्ज शुल्क
सामान्य, EWS, OBC – रु 850
SC, ST आणि दिव्यांग – रु. 175

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा