जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 400 पदे भरली जातील. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026 आहे.

भरतीसाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या समकक्ष पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.

वयोमर्यादा
वयोमर्यादेबाबत, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे आहे. याचा अर्थ असा की उमेदवाराचा जन्म २ डिसेंबर १९९७ पूर्वी किंवा १ डिसेंबर २००५ नंतर झालेला नसावा.

अर्ज शुल्क
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹800 + GST आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व महिला उमेदवारांसाठी शुल्क ₹600+ GST आहे आणि अपंग उमेदवारांसाठी ₹400 + GST आहे. शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. अधिक माहितीसाठी, उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी NATS पोर्टलवर जा.
यानंतर तुम्हाला तिथे स्टुडंट रजिस्टर किंवा लॉग इन असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला संबंधित बँकेत अप्रेंटिस पदावर क्लिक करुन संपूर्ण फॉर्म भरा.
यानंतर शैक्षणिक माहिती, फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करा.









