जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ ही आहे. Bank of India Recruitment 2025

इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.bank.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ₹120000 पर्यंत मासिक वेतन मिळेल. अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया. Bank of India Bharti 2025

पदाचे नाव & तपशील:

| पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
| 1 | क्रेडिट ऑफिसर | SMGS-IV | 36 |
| 2 | क्रेडिट ऑफिसर | MMGS-III | 60 |
| 3 | क्रेडिट ऑफिसर | MMGS-II | 418 |
| Total | 514 |
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना (SC/ST/OBC/PWD) किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी, 25 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क किती असेल?
SC/ST/PWD: ₹१७५
सामान्य आणि इतर श्रेणी: ₹८५०
निवड प्रक्रिया
बँक ऑफ इंडिया भरतीसाठी निवड दोन टप्प्यात घेतली जाईल:
ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत









