⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | सरकारी बँकेत ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना नोकरीचा गोल्डन चान्स, 220 जागांसाठी भरती सुरु

सरकारी बँकेत ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना नोकरीचा गोल्डन चान्स, 220 जागांसाठी भरती सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank of Baroda Bharti 2023 : बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून संबंधित संकेतस्थळावर याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पदवी पास उमेदवारांना मोठी संधी आहे.

या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 (11:59 PM) आहे. या भरतीअंतर्गत एकूण 220 पदे भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव सोबत शैक्षणिक पात्रता :
1) झोनल सेल्स मॅनेजर 11
शैक्षणिक पात्रता : (
i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव

2) रीजनल सेल्स मॅनेजर 09
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव

3) असिस्टंट वाइस प्रेसिडेंट 50
शैक्षणिक पात्रता 
: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव

4) सिनियर मॅनेजर 110
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

5) मॅनेजर 40
शैक्षणिक पात्रता : 
i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 48 वर्षे दरम्यान असावे. 1 एप्रिल 2023 रोजी वयाची गणना केली जाईल. तर आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार कमाल वयात सवलत दिली जाईल.

मुंबईत नोकरीची संधी..! तब्बल 4374 पदांची भरती सुरु

कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
यानंतर, उमेदवाराला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. bankofbaroda.in उघडा.
त्यानंतर वैयक्तिक>करिअर>सध्याच्या संधींची लिंक फॉलो करा.
त्यानंतर कराराच्या आधारावर MSME विभागातील विविध पदांसाठी भरतीच्या अर्ज बटणावर क्लिक करा.
अर्ज करा बटणावर क्लिक करताच अर्ज उघडेल.
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
यानंतर उमेदवार त्यांची आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.
अर्ज फी भरा.
सर्व माहिती तपासल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.