⁠ 
शनिवार, मे 18, 2024

बँकांच्या सुट्ट्या बदलणार? आता आठवड्यातील ‘या’ दिवशी बँका बंद राहणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी असून दर आठवड्याला बँकेच्या सुट्टीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावर अजूनही विचार सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास बँक कर्मचाऱ्यांनाही दर आठवड्याला २ दिवस सुट्टी मिळेल, म्हणजेच बँक कर्मचाऱ्यांनाही आठवड्यातून २ दिवसच काम करावे लागेल. 28 जुलै रोजी इंडियन बँकिंग असोसिएशनची (SBI) याबाबत बैठक होणार असू त्यात बँकांच्या सुट्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या म्हणण्यानुसार, याआधीच्या शेवटच्या बैठकीत १५ दिवस कामकाजाचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करण्यात आली होती. इंडियन बँक्स असोसिएशनने सांगितले की चर्चा सुरू आहे आणि या मुद्द्यावर विचार सुरू आहे. यूएफबीयूच्या म्हणण्यानुसार यावर वेगाने काम सुरू आहे.

कामाचे तास वाढतील
जर 5 दिवसांच्या कामकाजाचा प्रस्ताव लागू झाला, तर सर्व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांमध्ये 40 मिनिटांनी वाढ होईल. यासंदर्भात 28 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच वित्त मंत्रालय आणि आरबीआयकडूनही मंजुरी घेणे आवश्यक आहे.

आता काय नियम आहे?
जर आपण सध्याच्या नियमांबद्दल बोललो, तर यावेळी बँकांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. याशिवाय तिसऱ्या आणि पहिल्या शनिवारी कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सध्या कर्मचारी २ दिवसांच्या साप्ताहिक रजेची मागणी करत आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

LIC मध्ये 5 दिवस कार्य प्रणाली लागू
आम्ही तुम्हाला सांगतो की LIC मध्ये 5 दिवस कामकाजाचा दिवस प्रणाली लागू करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर पुढील महिन्यात बँकांमध्ये १४ दिवस सुट्या असतील, परंतु या काळात तुम्ही ऑनलाइन बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकता.