⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

यावल शिवारात माथेफिरूने केळीची झाडे कापून फेकली ; शेतकऱ्याचे 25 लाखाचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । मागील गेल्या काही दिवसात यावलसह रावेर तालुक्यात केळीची झाडे कापून फेकल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. त्यातच आता यावल शिवारातल्या एका शेतकर्‍याच्या शेतातील केळीची झाडे कापून माथेफिरूने फेकल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आलीय. यात सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले.

अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या मालकीचे यावल शिवारातील शेत गट नंबर ९०७ मध्ये एक हेक्टर ८६ आर या क्षेत्रामध्ये केळीची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र अज्ञात माथेफिरूंनी त्यांच्या शेतामधील ७००० केळीचे झाडे कापून फेकली. काल सकाळी राजेंद्र चौधरी यांच्यासह त्यांचे पुत्र हे काल सकाळी शेतात गेले होते. यानंतर आज सकाळी भूषण चौधरी हा शेतामध्ये गेला असता त्याला शेतातील केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले.

यात शेतकऱ्याचे सुमारे २५ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल पोलीस पोलीस गाठले आणि अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५९ भादवी कलम ४४७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला यात पंचवीस लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आधीच यावल परिसरासह तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु आहे. सोबतच चोरीच्या घटना तसेच शेतकऱ्यांचे साहित्य चोरीसह केळीची खोडे कापण्याचे प्रकार वाढतच आहे. मात्र पोलिसांकडून ना अवैध धंद्यांना लगाम लावला जात आहे ना चोरट्यांचा बंदोबस्त केला जात आहे.