⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

शिवसेना बंडखोर आमदारांना निवडणूक लढवण्यास बंदी घाला : सर्वोच्च न्यायालयात याचिका

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच कसा सुटणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलेलं आहे. मात्र आता हे प्रकरण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. महिला काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी हि याचिका दाखल केली आहे. जया ठाकूर यांनी ठाकूर यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर बोट ठेवत त्यांनी हि याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या जया ठाकूर यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांचा संदर्भ देत दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीये. ‘पक्षांतर करणाऱ्या आमदारांना पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश द्या. शिवसेना आमदारांचा पक्षांतराचा प्रयत्न अयोग्य आहे, कारण ते दोन तृतीयांशपेक्षा कमी आहे,’ असं याचिकेत म्हटलंय. “याचाच फायदा घेऊन देशातील राजकीय पक्ष आणि बंडखोर स्वार्थी आमदार देशातील विविध राज्यातील निवडून आलेली सरकारं सातत्यानं पाडतं आहेत. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाचं महत्त्व आणि सुशासन राहण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य स्थिरता आवश्यक असते”, असंही त्यांनी म्हटलंय.

‘निवडणूक लढवण्यास बंदी घाला’; शिवसेना बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका बंडखोरी करणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्यानं शिवसेनेनं नव्याने आव्हान केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर आज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आव्हान केलंय. परत आल्यानंतर चर्चा करूयात. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेरही पडेल, असं राऊत यांनी म्हटलंय.