जळगाव शहर

बांभोरीची‎ तबिता पाटील सौंदर्य स्पर्धेत विजेती‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । ‎ पुणे येथे गौरा फॅशन क्लब‎ आयोजित वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची २०२२ या‎ सौंदर्य स्पर्धेत बांभोरी येथील तबिता ‎पाटीलने विजेतेपद पटकावले. गौरी ‎नाईक आणि जयंत पाटील यांनी या ‎ सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते.‎

ग्रँड फीनालेचा सोहळा बोट क्लब‎ पुणे येथे झाला. ५५ स्पर्धकांनी‎ सहभाग घेतला. मिस. वर्ल्ड रोहित ‎खंडेलवाल, अभिनेता मिलिंद‎ गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप‎ बोरावके, गौरी नाईक, प्राची‎ भावसार , चैतन्य गोखले व चैताली‎ नेहेते यांनी परीक्षक म्हणून काम‎ पाहिले. भारत सुरती यांनी मेन्स‎ डिझाइनर पार्टनर व बेनविन कुटिनो‎ ‎ यांनी लेडीज डिझायनर पार्टनर‎ म्हणून सहकार्य केले. महेश सोनी‎ यांनी सूत्रसंचालन केले. विविध‎ क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी‎ बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान‎ करण्यात आला.‎

Related Articles

Back to top button