⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

बामणोदची वांगी बाजारात दाखल ; ‘एवढा’ आहे प्रति किलोचा भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । यावल तालुक्यातील भालोद बामणोद व अमोदे येथील भरताची वांगी खान्देशात प्रसिद्ध आहे. त्याची मागणी आता राज्यासह परराज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात वांगी विक्रीस दाखल झाली असून, प्रति किलो ६० रुपये दर आहे.

खान्देशात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बामणोद, भालोद व अमोदे येथील भरताच्या वांग्याची लागवड जून महिन्यात केली जाते. जून महिन्यात केल्या गेलेल्या वांग्यांचे उत्पन्न ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या कालावधीत सुरवात होते. बामणोद परिसरातील भरिताची वांगी प्रसिद्ध असून, लसलशीत चमकणाऱ्या वांग्यांना खव्याची मोठी मागणी असते. थंडीच्या दिवसांवर चवदार भरीत पाठ्यांना मोठी रंगत येत असते. भालोदसह बामणोद, अमोदे येथील वांगीसुद्धा प्रसिद्ध आहेत.

या भरीत ताज्या वांग्यांना संपूर्ण खान्देशसह नाशिक, मुंबई, औरंगाबाद नागपूर, शेजारच्या गुजरात आणी मध्यप्रदेश या राज्यांतील सुरत, बडोदा, अहमदाबाद, खंडवा, इंदूर, भोपाळ येथील नोकरीनिमित्त असलेले नागरिक या भरताच्या आस्वादासाठी गावाकडे येऊन भरीत पार्टीचे आयोजन करीत असतात. शेतामध्ये काट्यांवर, भाजलेल्या वांग्यांच्या भरीताची चव वेगळीच असते. या वांग्यांना तेलसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुटते. या वांग्यांना बाजारभाव साधारण १०० रुपये किलो याप्रमाणे मिळतो. तर सध्या ५० ते ६० रुपये किलोप्रमाणे या वांग्यांची विक्री होत आहे.

वांग्याची आवक वाढणार
जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे तसेच जळगाव तालुक्यातील आसोदा, भादली, ममुराबाद, विदगाव, कानळदा तसेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव या परिसरातील वाग्यांनाही बाजारात मागणी आहे. बामणोद येथील वाग्यांची रोपे घेवून जिल्ह्यात अनेक गावांमध्ये वाग्यांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते. शहरातही भरीत सेंटर केंद्रावर भरीतची मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.