जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । शेती उत्पादन वाढविण्यासाठी बाजारात विविध रासायनिक खते उपलब्ध असली असली तरी आजही शेणखताला मागणी आहे. पशुधनाची संख्या कमी झाल्याने परिसरात यंदा शेणखत महागले आहे. एका ट्रॉलीला ३ हजार २०० ते ३ हजार ४०० रुपयांपर्यंत भाव आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोड्या गाई, म्हशींचा गोठा असायचा. पूरक दुग्ध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अनेकांकडे पशुधन होते, मात्र यांत्रिकीकरणामुळे नांगरणीची कामे सोपी झाली पयार्याने बैलांचे कामही कमी झाले. पशुखाद्य, चारा महागल्याने पशुव्यवसाय परवड नसल्याने
पशू संगोपनाकडे कुणी वळत नाही. पर्यायाने परिसरात जनावरांची संख्या कमी झाली आहे. उन्हाळ्यात चाऱ्याचा मोठा निर्माण होतो.
शेतीसाठी शेणखताचा वापर केला तर जमिनीची पोत सुधारते, उत्पादनात वाढ होते. यामुळे बहुतेक शेतकरी पेरणीपूर्वी शेतात शेणखत टाकतात. यंदा सुमारे ३ हजार ४०० पर्यंत प्रति ट्रॅक्टर भाव शेणखताला मिळाला आहे.
बदलत्या काळानुसार शेतकरी रासायनिक ऐवजी सेंद्रिय खतांकडे वळत आहेत. काही, शेतकरी शेतात शेणखत पडावे यासाठी शेळ्या, मेंढ्या, गाई आपल्या शेतात बसवितात. यामुळे शेती उत्पादनात चांगला फायदा होतो. उत्पादनात चांगली वाढ होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.