जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । सुरु झाला तेव्हापासून बजरंग बोगद्यावर काही ना काही अडचणी सुरूच आहे. काल शनिवारी दुपारी एक उंच वाहनाने बाेगद्याला लावलेल्या लाेखंडी क्राॅस बारला धडक दिल्याने बोगद्याखालून जाणारी वाहतूक बंद झाली होती.


बंदी असतांना देखील येथून अनेक अवजड वाहने जात असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक नागरिक गेल्या अनेक दिसवांपासून करत आहे. परंतु प्रश्नाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम काही ना काही अडचणी येत असतात.