रेल्वे प्रवाशांसाठी ‘गुड न्यूज’! बडनेरा-नाशिक मेमू आता कायमस्वरूपी धावणार

एप्रिल 29, 2026 2:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. अनेक दिवसांपासून ‘विशेष’ गाडी म्हणून धावणारी बडनेरा-नाशिक रोड मेमू (MEMU) आता नियमित स्वरूपात धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे जळगावसह भुसावळ, पाचोरा आणि चाळीसगावच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

badnera nashik road memu

आतापर्यंत बडनेरा ते नाशिक रोड मेमू गाडी ०१२११/०१२१२ या क्रमांकासह धावत होती. आता नियमित झाल्यानंतर ही गाडी ६११२९/६११३० या सुधारित क्रमांकाने धावेल. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ही मेमू आता १२ डब्यांसह धावणार आहे. दरम्यान, विशेष गाडी म्हणून धावताना प्रवाशांच्या मागणीवरुन सदर गाडीला बऱ्याच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता ती नियमित स्वरुपात धावणार असल्याने प्रवाशांना अधिक सुलभ व कमी तिकीट दरात प्रवासाची हमी मिळणार आहे.

असे आहेत वेळापत्रक?

दररोज सकाळी १०.०५ वाजता बडनेरा येथून सुटणारी मेमू रेल्वे त्याच दिवशी रात्री ०७.४० वाजता नाशिक रोड येथे पोहचेल. तर सकाळी ०५.३५ वाजता नाशिक रोड येथून सुटणारी मेमू रेल्वे रात्री ०९.१५ वाजता बडनेरा येथे पोहचेल.

या स्थानकावर आहेत थांबे?

प्रवासादरम्यान दोन्ही बाजूने मुर्तिझापूर, बोरगाव, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड स्थानकांवर मेमूला थांबा असेल. विशेषतः जळगाव जिल्ह्यात असलेल्या थांब्यामुळे प्रवाशांना दुपारच्या वेळी सोयीची गाडी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत सकाळी १०.०५ वाजता सुटणारी बडनेरा–नाशिक रोड मेमू लवकरच थेट अमरावती रेल्वे स्थानकावरुन सुटणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे अमरावतीतील प्रवाशांना बडनेरा येथे जाऊन गाडी पकडण्याची गरज राहणार नाही.नव्या व्यवस्थेनुसार ही गाडी अमरावती–नाशिक रोड मेमू या नावाने ओळखली जाणार असून, ती सकाळी अंदाजे ९.३० ते ९.४० दरम्यान अमरावती स्थानकावरून सुटेल आणि पुढे बडनेरामार्गे नाशिक रोडकडे प्रवास करेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now