जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. यातच बडनेरा-नाशिक मेमू रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. मात्र अशातच मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवासाची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन बडनेरा-नाशिक मेमू सेवा पूर्ववत सुरू केली आहे. ही गाडी तिच्या वेळेनुसार धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने बडनेरा-नाशिक- बडनेरा मेमूला २४ मार्च पासून पूर्ववत केली असून ही गाडी आपल्या नियोजित वेळेत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१२१२ बडनेरा-नाशिक मेमू रविवार, २४ मार्चपासून आपल्या नियोजित वेळेत बडनेरा स्थानकापासून सुटेल.
तर गाडी क्रमांक ०१२११ नाशिक-बडनेरा मेमू रविवार, २४ मार्चपासून आपल्या नियोजित वेळेत नाशिक स्थानकापासून चालू झालेली आहे. प्रवाशांनी नोंद घ्यावी व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या स्थानकांवर आहे थांबा
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकावर थांबे आहेत.