⁠ 
रविवार, मे 19, 2024

Azadi ka Amrit Mahotsav : जळगावच्या तरुणाची राष्ट्रभक्ती, वाहनांना मोफत लावणार अनलिमिटेड ‘तिरंगा’ स्टिकर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । आजादी का अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत देशभर उत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. जळगावकर देखील अभियानात सहभागी होत असून एका व्यावसायिकाने चक्क ५ दिवस कितीही वाहनांना तिरंगाचे स्टिकर मोफत लावून देण्याचे अभियान हाती घेतले आहे. पांडे डेअरी चौकातील संजू आर्टसचे संचालक संजय चव्हाण यांनी याबाबत ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ला माहिती दिली आहे. Jalgaon youth’s patriotism, Unlimited ‘Tiranga’ sticker will be applied to vehicles for free!

आजादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्य वर्षानिमित्त यंदाचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रम राबवित साजरा केला जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून शाळा, महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निम शासकीय कार्यालयांना उपक्रमासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

जळगावातील पांडे डेअरी चौकातील संजू आर्टसचे संचालक संजय चव्हाण यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या दुकानाबाहेर चव्हाण यांनी आजादी का अमृत महोत्सवचे चिन्ह असलेला विद्युत रोषणाईचा आकर्षक बोर्ड लावला आहे. इतकंच नव्हे तर दि.१५ ऑगस्टपर्यंत ते प्रत्येक वाहनाला मोफत तिरंगा स्टिकर लावून देणार आहे. राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यासाठी चव्हाण यांनी हा उपक्रम हाती घेतला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सीमेवर जाऊ शकत नसलो तरी मी माझं योगदान देणार : संजय चव्हाण
मी एक भारतीय असून माझ्यासाठी माणुसकी आणि देश सर्वप्रथम आहे. देशासाठी मी सीमेवर जाऊन लढा देऊ शकत नसलो तरी सर्वांच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी मी माझे योगदान नक्की देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. उद्यापासून दि.१५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील कोणताही वाहनधारक आमच्याकडे आल्यास त्याचा वाहनावर आम्ही मोफत तिरंगा स्टिकर लावून देणार आहे. इच्छुकांनी संजू आर्टस, लुंकड टॉवर, पांडे चौक, जळगाव याठिकाणी किंवा मो.९९२३५७४२७२, ७७६९९४७९९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संजय चव्हाण यांनी केले आहे.