---Advertisement---
महाराष्ट्र

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । आयुर्वेद, योग व संगीतोपचार विषयांतील तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज निधन झालं आहे. प्रकारुती बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच तांबे यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

balaji tambe

तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना देश-विदेशातून मोठी मागणी होती. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे.

---Advertisement---

बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं.

दरम्यान, आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---