⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आरोग्य दिनाबद्दल जनजागृती

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आरोग्य दिनाबद्दल जनजागृती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाद्वारे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत गुरुवार दिनांक ७ एप्रिल रोजी रॅलीसह विद्यार्थ्यांना हेल्दी डाएट फूडचे महत्व पटवून देण्यासाठी उपक्रम घेण्यात आले. याप्रसंगी फास्टफूडचे दुष्परिणाम आणि सात्विक पदार्थांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

निरोगी आणि सुदृढ आरोग्य असणारे अधिक कार्यक्षम असतात आणि दीर्घकाळ जगतात तसेच रोगमुक्त असतात. नागरिकांच्याआरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. यंदाच्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने अवर प्लॅनेट अवर हेल्थ ही संकल्पना असून ग्रहाच्या आणि त्यावर राहणार्या माणसांच्या आरोग्याकडे जागतिक लक्ष वेधण्याचा हा उद्देश्य आहे. प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे सत्य नाकारता येत नसल्याने ’हवामान संकट हे आरोग्य संकट’ असल्याचा यातून संदेश देण्यात आला आहे. त्याअनुसार गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने आज दिवसभर आरोग्य दिन जनजागृतीबाबत उपक्रम राबविले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालय परिसरात रॅली काढून सात्विक आहार, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. भर उन्हाळ्यात वृक्षांना देखील वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते ते ओळखून सर्वांनी वृक्षांना पाणी दिले.

यानंतर डॉ.उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे बीएस्सी प्रथम वर्ष, जीएनएम द्वितीय वर्ष आणि फंटामेंटल ऑफ नर्सिंग विभागाद्वारे विद्यार्थ्यांना आरोग्य दिनाचे महत्व पटवून दिले. तसेच निरोगी आरोग्यासाठी फास्ट फूड किती घातक आहे, याचे पोस्टर्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी देखील यापुढे आम्ही सात्विक आहारच घेऊ असे सांगितले. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य अनघा पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील सर्वच स्टाफची उपस्थीती होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.