⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : पुन्हा अवकाळीचा शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | शेतकऱ्यांना अवकाळीमुळे आधीच शेती करणं कठीण झालं आहे. त्यातच आता पुन्हा अवकाळीचा प्रश्न पुढे ठेपला आहे.कारण पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी २६ ते २८ एप्रिलदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यंदा तापमानाची तीव्रता अधिक असल्याने अरबी समुद्रात पाण्याची वाफ होऊन ढग तयार होण्याचे प्रमाण वाढले असल्याने अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण गेल्या महिन्यापासून वाढल्याची माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

२६ ते २८ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण राहील. त्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पडणार नाही, असे चित्र असेल.