जळगाव लाईव्ह न्यूज : १२ मार्च २०२३ : संपूर्ण देशासह राज्यात एच ३एन २ इन्फ्लुएंझा व्हायरसची साथ वाढत आहे. पर्यायी निती आयोगाने संपूर्ण भारतातील नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.यामुळे नागरिकांनी सावधानी घेणे आवश्यक आहे.
अधिक माहिती अशी कि, तीन वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू झाला होता. यानंतर सर्वांनाच पुढील किमान दोन वर्षे मास्क वापरावा लागला होता. गेल्या सव्वा वर्षापासून मास्क सक्ती रद्द करण्यात आलेली आहे. तथापि, आता आपल्याला किमान सार्वजनीक गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापरावा लागणार आहे. अर्थात, हा निर्णय ऐच्छीक असला तरी याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा निती आयोगाने केली आहे.
देशभरात सध्या एच३एन२ इन्फ्लुएंझा अर्थात फ्ल्यूची साथ पसरली आहे.फ्लूचा प्रसार मोठ्या गतीने होत असल्याने लक्षावधींना याची बाधा झाल्याचे मानले जात आहे. ही व्याधी कोरोना इतकी घातक नसली तरी देखील लोकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यायी याचमुळे निती आयोगाने देशातील नागरिकांनी सार्वजनीक गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापरावा असे निर्देश जारी केले आहेत