⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | धक्कादायक! पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

धक्कादायक! पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे तरुणांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला असून आत्मदहन करणाऱ्या तरुणांवर पुढील कारवाई सुरू आहे.

UPSC नागरी सेवा परीक्षेत चाळीसगावच्या तरुणाची बाजी

भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले असून वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज करूनही अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. हे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. यासंदर्भात यापूर्वी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.

महिलेने दिला तब्बल 26 बोटांच्या बाळाला जन्म

अखेर या तरुणांनी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी १ वाजता पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रेाल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी वेळीच दाखल झाल्यामुळे प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे. या आत्मदहन करण्याचा प्रयत्नामुळे पाचोरा शहरात एकच कळबळ उडाली होती. आत्मदहन करणाऱ्या तरुणांवर पुढील कारवाई सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.