गुन्हेयावल

चोरट्यांचा प्रताप ; मध्यरात्री गोदामातुन कापसाच्या गोण्या चोरून भरला आयसर, पण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यातील दहिगांव येथील एका शेतकऱ्याच्या गोदामातून अज्ञाताने कपाशी आयसरमध्ये भरून चोरून नेण्याच्या प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांने यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील दहिगांव येथील प्रेमचंद शांतीलाल जैन यांचे सावखेडा सिम रस्त्यालगत गोदाम आहेत. त्यात त्यांनी ३० क्विंटल कापूस भरलेले असता अज्ञाताने १४ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने गोदामाचे मुख्य दरवाजेचे कुलप तोडून त्यातील बाहेर असलेल्या आयसरमध्ये कापसाच्या गोण्या फेकून चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र आयसर गाडी (क्र. एम एच १८ एम ८२७७) हे सुरुच झाली नाही. त्यात अज्ञात गाडी सोडून पसार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी उघडकिला झाली आहे. या घटनेची एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे हे ७ लाखाचे कापूस सागण्यात येत आहे. स्थानिय नागरिकांनी आयसरच्चा जवळ धाव घेतल्याने कापसाची चोरी झालेली नाही आहे परंतु शेतकऱ्याने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केलेली नाही. तरिही दहिगाव दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व गावाचे पोलीस पाटील सतोष पाटील यांनी घटनेची माहिती घेतली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button