⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | चिनावल येथील तालुका वैद्यकीय कार्यालय स्थलांतरचा घाट

चिनावल येथील तालुका वैद्यकीय कार्यालय स्थलांतरचा घाट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । चिनावल येथील रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट पंचायत समिती रावेर यांचेकडून घातला जात असुन रावेर येथे कोणतीही सोयी सुविधा नसतांना ऐन कोरोना काळात काही पंचायत समिती सदस्यांनी तालुका वैद्यकीय कार्यालयाची पळवापळवी चालवली आहे. या पळवा पळवी ला  नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी  कार्यालय हवे अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी मागणी केली होती तसा ठरावही पंचायत समिती बैठकीत संमत करण्यात आला होता. परंतु आजच रावेर येथे कार्यालयासाठी वा लसीसाठी सोयी सुविधा नसल्याने कार्यालय हलवणे सोयीचे ठरणार नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

तालुका वैद्यकीय कार्यालय तालुक्याच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टीकोनातुन मध्यभागी असल्याने  सात  प्राथमिक आरोग्य .केंद्रांपैकी दोन ऐनपुर व वाघोड रावेर नजीक असुन उर्वरीत पाच  आरोग्य केद्र खिरोदा, चिनावल, लोहारा, थोरगव्हाण ,निंभोरा हे  चिनावल येथे  सोईचे या ठीकाणहुन विविध वैद्यकीय साहित्य ,लसा ने आण करता येत असते. त्यामुळे चिनावल तालुक्याचा कार्यभार पहाणे सोईचे जाते .  बालकांच्या व गरोदर मातांच्या दिल्या जाणाऱ्या लसींची साठवणूक करणेसाठी आय.एल.आर व डिप फ्रिजर याचे +2 ते +8 याच तापमानात प्राथमिक आरोग्य केंद्र चिनावल येथे होत असते व तापमानाची देखरेख चिनावल प्राथमिक.आरोग्य .केंद्रातील कर्मचारी हे करीत असतात.

जर रावेर येथे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आल्यास सदर लसीची देखरेख करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही अशा. परिस्थतीत जर लसींची व्ही.व्ही.एम , देखरेख वेळोवेळी न झाल्यास व लस खराब होऊन लाभार्थीना दिली गेल्यास जिवीत हानी मोठया प्रमाणावर होऊ शकते रावेर येथे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी  येवढ्या मोठ्या समस्या असतांना पंचायत समिती सदस्य यांचा घाट कशासाठी यात नेमक कोणत राजकारण शिजते आहे.या विषयाकडे लोकप्रतीनिधी तत्परतेने लक्ष देतील का अशी आग्रही मागणी  नागरीक करीत आहे.

पंचायत समिती सदस्य यांना उशिराच शहाणपण

रावेर तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय हलवण्याचा ठराव संमत करून घेतला असून कार्यालय हलवण्याची तशी हालचाल सुरू आहे.  कोरोना काळात ग्रामीण भागातील कोरोना लसीची वाटप चिनावल येथील वैद्यकीय कार्यालयातूनच केली जात असते आत्ताच कार्यालयाची हालचाल केल्यास या सर्व बाबींची उपायोजना करावी लागणार आहे फक्त जागा उपलब्ध झाली म्हणून सर्व काही आलबेल होणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय ही चिनावल येथेच आहे एवढ्या काळात कधीही पंचायत समिती सदस्यांना हे शहाणपण सुचलं नाही. वैद्यकीय कार्यालयाकडून तालुक्यातील सर्व प्रकारची कामे नियमित  व व्यवस्थितरीत्या पार पडत असतात  कोणतीही तक्रार कार्यालयाची नाही शह-काटशहाच्या राजकारणामुळे तर पंचायत समिती सदस्य तालुक्यातील  नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का..?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिनावल येथिल तालुका वैद्यकीय कार्यालय रावेर येथिल पंचायत समिती जवळील हाँल मध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु असुन याबाबत चिनावल येथिल वैद्यकीय तालुका कार्यालय अंतर्गत  तालुक्यात सात आरोग्य केंद्र असुन चिनावल आरोग्य केंद्राच्या साते ते नऊ किलोमीटर परिसरात खिरोदा.लोहारा.निंभोरा.थोरगव्हण.चिनावल असे पाचआरोग्य केंद्र असुन सोईचे  आहे पंचवीस किलोमीटर नेण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला असुन चिनावल येथिल तालुका वैद्यकीय कार्यालय हालवण्याचा घाट हानुण पाडण्यासाठी जनअंदोलन करण्यात येईल
– कमलाकर रमेश पाटील,  कोचुर

कोरोना काळात चिनावल रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयातून नागरिकांची सेवा अव्याहतपणे चालू आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण तालुक्यातील नागरिकांना आलेली नाही मग चीनावल येथील टी एम ओ कार्यालय हलवण्याची  गरज काय
-श्रीकांत सरोदे, चिनावल

चीनावल येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालय रावेर येथे स्थलांतरासाठी पंचायत समिती च्या मासिक सभेत ठराव संमत करण्यात आला होता परंतु सध्या कोरोना काळ आहे त्यामुळे पंचायत समिती यांनी वैद्यकीय अधिकारी कार्यालय येथे राहू द्यावे
-गोपाळ नेमाडे, सभापती कृऊबा रावेर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.