⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | दुचाकीचा कट लागल्याने शस्त्रांसह घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड

दुचाकीचा कट लागल्याने शस्त्रांसह घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । चाळीसगाव रस्त्याने जाणाऱ्या सायकलीला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तलवार व कोयत्यानिशी घरी जाऊन तेथील वाहनांची तोडफोड करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरात जयशंकर नगरमध्ये घडला. ही घटना शुक्रवारी (दि.२२) दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी चारूदत्त नानाभाऊ पवार रा. जयशंकर नगर, भडगाव रोड यांचा मुलगा राम हा करगाव रस्त्याने सायकलीवरून जात असतांना त्याच्या सायकलीचा कट सिद्धांत आण्णा कोळी याच्या दुचाकीला लागला. त्यावरून सिद्धांत आण्णा कोळी, सौरव आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही तसेच नेवरे व जाधव पूर्ण नाव गाव नाही व इतर दोन तीन अनोळखी मुले अशांनी चारूदत्त पवार यांच्या भडगाव रोडवरील जयशंकर नगरमधील घरी येऊन त्यांच्या मालकीची कार, दुचाकी तसेच बुलेट या वाहनांची तोडफोड केली. त्यात पवार यांचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार २२ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चारूदत्त पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सिद्धांत आण्णा कोळी, सौरव आण्णा कोळी रा. छाजेड ऑईल मीलच्या पाठीमागे व रोकडे पूर्ण नाव माहित नाही तसेच नेवरे व जाधव पूर्ण नाव गाव नाही अशा पाच जणांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४,४२७, ३३६ सह मुंपो कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.तपास सपाेनि सचिन कापडणीस करत आहेत.

या गुन्ह्यातील काही आरोपींवर अगोदरही शहरात हाणामारीसह गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा हद्दपारीचा प्रस्तावही गेल्यावर्षी वरिष्ठाकडे पाठवला होता. परंतु तो रद्द झाला. आता पुन्हा या आरोपींचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सपाेनि सचिन कापडणीस यांनी दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह