जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जामा मशीदीमध्ये आज शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये कमीतकमी ३० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नमाज पठणावेळी आलेल्या गर्दीला लक्ष्य करण्यात आले. या घटनेमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
स्फोटानंतर मदतीला पोहोचलेल्या लोकांनी जखमींना मोटरसायकल, कारमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. एका बातमी नुसार पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढले आहे. लेडी रीडिंगच्या हॉस्पिटल प्रवक्त्याने सांगितले की, १० जखमींची प्रकृती अति गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. घटनेत जवळपास ५० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
पेशावरची राजधानी शहराचे पोलीस अधिकारी एजाज अहसान यांनी या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आतापर्यंत ३० मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.
अहसान यांनी सांगितले की, सुरुवातीच्या वृत्तानुसार पेशावरचा भाग ख्वानी बाजारात दोन अतिरेक्यांनी मशीदीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मशीदीच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस मारला गेला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी अडविल्यानंतर देखील एकाने आतमध्ये प्रवेश करीत स्वतःकडे असलेल्या बॉम्बचा वापर करीत आत्मघाती स्फोट घडवून आणला आहे.