गुन्हेजळगाव शहर

जळगावात परप्रांतीय महिलेवर मालकाकडून अत्याचार, दोघांनी केला विनयभंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. अशात कामानिमित्त जळगावात आलेल्या परप्रांतीय महिलेवर मालकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला ही कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. ती रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१ पासून महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक आहे. त्याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून अत्याचार केला.

हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दुकानातील मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील अंगाला हात लावून विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकले. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने रा. नाशिक, दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button