जळगाव शहर

अत्याचार व हत्या प्रकरण : मुस्लिम समाजातर्फे जळगावात थाळीनाद आंदोलन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । गुजरात मध्ये २००२ मध्ये सामूहिक अत्याचार व सात निष्पाप लोकांच्या झालेल्या हत्या प्रकरणात अकरा आरोपी तुरुंगात होते मात्र, येथील सरकारने (रेमिशन पोलिसी) यांनी १५ ऑगस्ट रोजी सदर आरोपींना माफी देऊन कारागृहातून सोडून दिले आहे. याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे जळगावात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधमांना पुनश्च तुरुंगात टाकून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन पाठवून केली. तसेच “रद्द करा रद्द करा माफीचा हुकूमनामा रद्द करा, झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, “अशा घोषणा देण्यात आल्या.

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना फार मानसन्मान महत्त्व देण्यात आलेले आहे. तसेच आपल्या संस्कृतीत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला तसेच हिंसाचारी व्यक्तीला अजिबात थारा नाही. असे असताना सुद्धा गुजरात मध्ये २००२ मध्ये झालेल्या सामूहिक अत्याचार व सात निष्पाप लोकांच्या झालेल्या हत्या प्रकरणात अकरा आरोपी तुरुंगात होते मात्र, येथील सरकार ने (रेमिशन पोलिसी)१५ऑगस्ट रोजी सदर आरोपींना माफी देऊन कारागृहातून सोडून दिलेले आहे. पंतप्रधान यांनी महिला सक्षमीकरण, महिलांच्या समान हक्क व विशेषत तीन तलाक कायद्याने मुस्लिम महिलांना दिलेली सुरक्षा, या सर्वांच्या गुजरात सरकारने अपमान केलेला आहे. तसेच सध्याचे राष्ट्रपती हे स्वतः महिला असल्याने त्या याकडे सहानुभूतीने बघतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच राष्ट्रपती हे स्वतः एक स्त्री असूनआपण कृपया या प्रकरणाकडे सहानुभूतीने बघावे, एका अत्याचार पीडित स्त्रीला व दुसरे जे निष्पाप लोक त्या दुर्दैवी घटनेत मारले गेलेले आहेत. त्यांना न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देऊन गुजरात सरकारचा हा माफी चा हुकूमनामा रद्द करावा. सदर नराधमांना पुनश्च तुरुंगात टाकून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

यावेळी अयाज अली नियाज अली, शिनीम बेगम अयाज अली, तबस्सुम बी रहीम, शगुफ्ता नियाज अली, गझाला बी बशीर, नाझीम पेंटर, शेख जमील, रियाझ अली, शफी ठेकेदार, शेख रागिब, अहेमद ठेकेदार, मुस्तकीम मुबारक बहेस्ती, शेख सलीम उद्दीन, तोसिफ कुरेशी, शेख शफीक अहमद, सलमान मेहबूब, रईस खान, वसीम खडसे, शब्बीर युसुफ, नईम खाटीक, झुलफिकार खान, अल्लाबक्ष बागवान, शमशुल मोहिनुद्दीन, शाहरुख जमील, वसीम शेख, इलियास नूरी, शेख आरिफ, शेख नूर मोहम्मद आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button