⁠ 
[rank_math_breadcrumb]

राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । भारत सरकारने विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार तरुण-तरुणी १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताचे त्यांचे व्हिजन मांडतील आणि सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याच्या आणि शिकण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत.

कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताची त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिद्ध जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांना सक्षम करणे, असा आहे.

४ टप्प्यात होणार निवड
विकसित भारत यंग लीडर्स चर्चासत्रच्या माध्यमातून या तरुणांची ४ टप्प्यांत निवड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, विकास भारत प्रश्नमंजुषा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल, ज्यामध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक MYBharat.gov.in पोर्टलवर नोंदणी करून भाग घेऊ शकतात. पहिल्या टप्प्यात निवडलेले तरुण दुसऱ्या टप्प्यातील विकास भारत ब्लॉग/निबंध स्पर्धेत सहभागी होतील. या टप्प्यातील निवडक युवक तिसऱ्या टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय पिच डेक-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील आणि तिसऱ्या टप्प्यातील विजेते अंतिम टप्प्यातील विकसित भारत राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतील. पहिला टप्पा २५ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत भारत सरकारच्या mygov पोर्टलवर आयोजित केला जाईल.

नेहरू युवा केंद्रातर्फे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील सर्व तरुणांना राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ – विकास भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वरील ४ टप्पे पूर्ण करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र जळगाव, गट क्र. ३८/१, प्लॉट क्र. २४, प्रेम नगर, जळगाव, फोन क्र. संपर्क ०२५७-२९५१७५४ किंवा इमेल आयडी [email protected] यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.