⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | गुन्हे | धक्कादायक ! जळगाव रेल्वेस्थानकावर तरुणाला मारहाण करत सोनसाखळी लांबविली

धक्कादायक ! जळगाव रेल्वेस्थानकावर तरुणाला मारहाण करत सोनसाखळी लांबविली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२३ । जळगाव रेल्वेस्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी लांबवून दोघे पसार झाले. याबाबत शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण व्यवसाय करत असून तो २५ ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास कामानिमित्त जळगाव रेल्वेस्थानकात आला होता. समोरील रिक्षा थांब्याजवळ उभा असताना चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे या दोघांनी भूषणची कुरापत काढली. कारण नसताना शिवीगाळ करून हुज्जत करण्यास सुरवात केली.

वाद कशाला घालताय असे म्हणत भूषणने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देाघांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत भूषणच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९७ हजार रुपयांची सेानसाखळी हिसकावून दोघे पसार झाले. सोनसाखळी तोडल्याचे लक्षात येताच भूषणने आरडा-ओरड केली. मात्र त्याच्या मदतीला कुणी आले नाही. यानंतर तो शहर पोलीस ठाण्यात पोचला. पोलिसांना माहिती दिल्यावर सांगितल्यानंतर मारहाण करणारे चेतन आणि अविनाश यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू झाला. मात्र दोघे मिळून आले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी तपास करत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.