IND vs PAK : भारत-पाक महासंग्राम आज रंगणार, घरबसल्या ‘असा’ बघा सामना
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) आज रविवारी भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. या महामुकाबल्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलय. हे दाेन्ही संघ ३०९ दिवसांनंतर समाेरामाेर येत आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे. दरम्यान, आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लाइव्ह सामना जर तुम्हाला पाहायचा असेल तो कुठे पाहता येईल, याची माहिती आता समोर आली आहे. तुम्ही घरी असा किंवा घराबाहेर, तुम्हाला हा सामना पाहता येऊ शकतो. पण घरी असताना कोणत्या चॅनेलवर आणि घराबाहेर अतसाना मोबाईलवर कसा सामना पाहू शकता, जाणून घ्या..
जर तुम्हाला टीव्हीवर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. शिवाय तुम्हाला हा सामना मोबाईलवर लाइव्ह पाहता येणार आहे. साठी तुम्हाला हॉटस्टारचे subscription घ्यायला लागेल.भारताचा हा सामना तुम्ही लाइव्ह Disney Hotstar वर पाहू शकता. त्यामुळे तुम्ही घरी असा किंवा घराबाहेर, तुम्हाला हा सामना पाहता येऊ शकतो. त्यामुळे आता सामना कसा आणि कुठे पाहायचा, याचे जास्त टेंशन चाहत्यांना नसेल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
दुबईत हा सामना संध्याकाळी ६.०० वाजता सुरु होणार आहे. पण भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या सामन्याचा फिल घ्यायचा असेल तर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून तुम्ही आनंद लुटू शकता. कारण टॉसच्या वेळीही बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्यामुळे या गोष्टीही तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे रविवारी ७.०० वाजल्यापासून ते रात्री ११.०० वाजेपर्यंत तुम्ही या सामन्याचा आनंद लुटू शकता.
दरम्यान, पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा कोणाला संधी देणार? प्लेइंग 11 कशी असेल? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.