शेतकऱ्यांसाठी भन्नाट योजना : सौर ऊर्जेसाठी सरकारला आपली जमीन द्या अन….

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी ही योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यात २०१७ पासून सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील महावितरणकडून ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरणकडून एकरी ३० हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात अनेक अल्पभुधारक जमीन असलेले शेतकरी आहेत. तसेच अनेकांकडे जमीनदेखील पडीत असते, अशा शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पन्न येत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेचा लाभ घेतला तर त्यांना फायदा होणार आहे. काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना…

पारंपारिक ऊर्जेची बचत व्हावी व अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा खर्च वाचवा यासाठी मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना राळेगणसिद्धी व कोळंबी येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ही योजना राबवली होती. त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षापासून जळगाव जिल्ह्यात देखील राबविण्यात येत आहे.याचा घेतला तर पडीत असलेल्या जमिनीतूनदेखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

एकरी ३० हजार रुपये..