⁠ 
सोमवार, जून 17, 2024

जिल्हयात तब्बल ११ हजार १९२ हेक्टरवरील शेतीचे पावसामुळे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.कारण मार्च महिन्यात ५ ते ७ व १५ ते १८ मार्च दोनवेळा अवकाळीच्या माऱ्याला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.

दोन्ही मिळून तब्बल सात दिवस झालेल्या अवकाळीमुळे एकूण ११ हजार १९२ हेक्टरवरील शेतीचे पावसामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये गहू, हरभरा, मका, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.

शासन पंचनामे करून मदत जाहीर करेल, ती शेतकऱ्याच्या हातात मिळेपर्यंत पुढील खरीप हंगाम येईल. ती मदतही वेळेवर मिळाली नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येईल असे म्हटले जात आहे.

-मार्चमध्ये अवकाळीने झालेले नुकसान- ११ हजार १९२ हेक्टर

-एकूण बाधित गावे- ३४१

-एकूण बाधित शेतकरी- १४ हजार ३८१

-गव्हाचे नुकसान- दोन हजार ५५५ हेक्टर

-मका नुकसान- सहा हजार ६१५

-ज्वारीचे नुकसान- एक हजार ६६०

-बाजरीचे नुकसान- १५६

-हरभऱ्याचे नुकसान- ४५३

-केळीचे नुकसान- ८९.८३

-इतर- ६०