कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही काम करतो आहे आणि उद्याही काम करत राहीन – शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । आम्ही ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत. यामुळे याचे उत्तम परिणाम आम्हाला आणि जनतेला दिसून येत आहे. असे मुख्यमंत्री शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले.
ते रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, आम्ही सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे.
अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असा टोला एकनाथराव शिंदे यांनी लगावला.
आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. असे शिंदे म्हणाले.