⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

डॉ.हनमंत धर्मकारे यांची हत्या करणाऱ्या क्रुर आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा द्या : बामसेफ

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकिय सेवेत रुजू असणारे डॉ. हनुमंत संतराम धर्मकारे यांची गोळ्या घालून हत्त्या करणाऱ्या क्रुर आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी लहुजी क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ रोजी जिल्हानिहाय व तालुकास्तरीय निवेदन देण्यात आले. दरम्यान मुक्ताईनगर येथे देखील तहसील कार्यालयात निवासी तहसीलदार निकेतन वाळे यांच्येकडे तालुक्यातील संघटनेच्यावतीने देण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दि.११ जानेवारी २०२२ रोजी मातंग समाजाचे डॉ हनुमंत धर्मकारे यांची अज्ञात इसमांनी गोळ्या घालून निर्घृणपणे हत्त्या केली.मात्र अद्यापही कृत्य करणाऱ्या काही आरोपींना अटक झालेली नाही.योग्य तपास करुन सर्व आरोपींना अटक व शिक्षा करण्यात आलेली नाही. याप्रकरणी संघटनेने न्यायीक मागण्या दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, तसेच हा खटला पुसंद ऐवजी नांदेड येथे चालवण्यात यावा,या हत्येचा तपास सी आय डी कडे देण्यात यावा,धर्मकारे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयाची आर्थिक मदत मिळण्यात यावी, डॉ.धर्मकारे यांची पत्नी डेंटिंस्ट असल्याने त्यांना पतीच्या जागेवर शासकिय सेवेत रुजू करावे.

आदी मागण्या बामसेफच्या संघटनेच्या आहे.मागण्या मान्य न झाल्यास यासाठी तीन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे.निवेदनाची प्रत मा.मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक, विभागीय पोलिस आयुक्त,पोलीस अधीक्षक व वैद्यकिय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडे पाठविण्यात आलेले आहे.निवासी तहसीलदार निकेतन वाळे,नायब तहसीदार झांबरे यांना निवेदन देतेवेळी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश ढगे,तालुका संयोजक प्रमोद सैदाणे, रमेश पाटील, सचिन हेरोळे,सुनिल कोळी याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.