---Advertisement---
पर्यटन महाराष्ट्र

अपूर्वाने मिळवला पहिली महिला मेट्रो चालक होण्याचा मान!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह अपूर्वा सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली. दडपण, मनातील काहूर, सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझे सांभाळत लोकोपायलट अपूर्वाने अपेक्षित स्थानक गाठले. प्रवासात एटीपी (ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन), टीबीसीच्या (ट्रॅक्शन ब्रेक कंट्रोलर ) तांत्रिक बाबी तसेच कंट्रोलरच्या सूचनांचे पालन करत तिने पुन्हा वनाझ स्टेशन गाठले.

jalgaon mahanagar palika 22 jpg webp webp

साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला होता. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची ‘मास्क ऑन की’ च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. दोघींनीही रेल्वे क्षेत्रात साताऱ्याची मान उंचावली आहे.

---Advertisement---

शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत राहणाऱ्या प्रमोद आणि उज्वला यांची कन्य अपूर्वा अलाटकर. अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीनंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परत यानंतर तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथील कल्याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली. तेथे काम सुरू असतानाच कोरोनाचा कहर वाढला आणि लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर ती साताऱ्यात परतली.

२०१९ मध्ये पुणे मेट्रोसाठीच्या विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. त्यानुसार तिने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर अपूर्वाला पहिल्या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्यात आले. पहिली, दुसरी व तिसऱ्या फेरीतील सर्व निकष, कठीण पातळ्या पूर्ण करत फेब्रुवारी २०२३ मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली.

मेट्रोच्या वतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे ४५ दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले.

४५ दिवसांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी आता चार महिन्यांपासून या भूमिकेत काम करत आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन निर्वासन व्यायामाचा समावेश होता, जे आव्हानात्मक पण आवश्यक होते. प्रवासी माझ्याशी आदराने वागतात तेव्हा ते खरोखरच आनंदाचे असते. त्यांचे कौतुक माझ्या कारकिर्दीतील सर्वात प्रेरणादायी पैलू आहे, असे पुणे मेट्रो चालक अपूर्वा अलाटकर हिने सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---