जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जळगाव लोकसभा मतदारसंघात 36 किमीच्या रस्त्यांना मंजुरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याने जळगांव लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 36.50 किमी अंतराच्या 31 कोटी 62 लक्ष च्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

स्मिता वाघ यांना खासदार होऊन काही दिवसच झाले असताना त्यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी जोमाने पाठपुरावा सुरू केला असून मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.यात पहिल्या टप्प्यात महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळविण्यात त्यांना यश आले आहे.

या रस्त्यांची होणार कामे
पाचोरा तालुक्यातील वरखेडी डांभुर्णी ते पिंप्री रस्ता -8.28 किमी(6कोटी 29 लक्ष), लोहटार ते तारखेडा रस्ता-5.95 किमी (5कोटी 49लक्ष),चाळीसगाव तालुक्यातील 1.एन एच 753 ते वाकडी रस्ता -6.15 किमी (4कोटी 90लक्ष),धरणगाव तालुक्यातील 1.पथराड ते वांजरी रस्ता-4.35 किमी (3 कोटी 71लक्ष),एरंडोल तालुक्यातील 1. ताडे भातखेडे ते पिंप्री सिम रस्ता-5.01 किमी (4कोटी 69लक्ष),पारोळा तालुक्यातील 1.सांगवी ते एन एच -6 ते बाभळेनाग रस्ता 6.76किमी (5कोटी 91लक्ष)

सदर रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल खा.स्मिता वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button