महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम; विविध विभागातील तज्ञांची नियुक्ती

ऑक्टोबर 1, 2025 3:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत घेऊन रूग्णसेवेच्या आरोग्यधामला महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना अत्यल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प या रुग्णालयाने केला आहे.

mahadev hospital

आजच्या काळात वाढती लोकसंख्या, जीवनशैलीतील बदल आणि विविध आजारांच्या वाढत्या समस्या यामुळे आरोग्यसेवेत अधिक सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर व्यवस्थापन गुरू डॉ. प्रशांत वारके आणि डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हे रुग्णालय सुरू करण्यात आले असून आधुनिक सुविधा रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

२४ तास आपत्कालीन विभाग, सुसज्ज आयसीयू, नवजात शिशूंसाठी एनआयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, रेडिओलॉजी विभाग (सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे), तसेच पूर्ण सुसज्ज तपासणी प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. रुग्णांना सर्व उपचार एका छताखाली मिळावेत यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.तज्ज्ञांची टीम अनुभवी आणि गुणी डॉक्टरांची फळी, प्रशिक्षित नर्सेस व पॅरामेडिकल कर्मचारी हे या रुग्णालयाचे बळ आहे.

हृदयविकारतज्ज्ञ, मेंदू व मणका विकारतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, किडनी व मूत्रविकारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अशा विविध शाखांतील तज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध आहे.समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी परवडणार्या दरात सेवा देण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने केला आहे. आपल्या शहरात इतक्या आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले रुग्णालय सुरू झाल्याने आता मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्याची गरज राहणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now