जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार प्रणालीवर चालून व आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने काम करत असलेली उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ संघटनेच्या अमळनेर युवा तालुकाध्यक्षपदी भाऊलाल नवल हटकर तर संपर्कप्रमुखपदी संदीप दिलीप मासुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवड यांच्या हस्ते करण्यात आली
भाऊलाल हटकर व संदीप मासुळे ( रा. चोपडाई ता. अमळनेर ) यांची निवड संस्थापक सल्लागार देविदास बापूसाहेब हटकर व अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी व जिल्हाध्यक्ष धुळे चेतन भाऊ , विठ्ठल मारनर , प्रविण हाके यांच्या शुभहस्ते नियुक्ती करण्यात आली. रमेश पवार, कृष्णकांत परदेशी, दुर्गेश खांडेकर उपस्थित होते. हटकर व मासुळे यांचे सामाजिक कार्य बघून त्यांची निवड केली आहे.