जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । केंद्रीय युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याव्दारे तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन-2020 वितरीत करण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्र शासनाकडे या पुरस्काराकरिता नामांकन सादर करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
ज्या खेळाडूंना या पुरस्काराकरिता अर्ज करावयाचे आहेत त्यांनी त्यांची आवश्यक कामगिरी एकुण तीन वर्षामधील म्हणजेच सन-2018, 2019 व 2020 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीनीवरील, समुद्रावरील व हवेमधील तसेच लाईफ टाईम अचिव्हमेन्ट असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असुन त्याबाबतची माहिती दोन-तीन पानांमध्ये हिंदी/इंग्रजी भाषेमध्ये देणे गरजेचे आहे,
पुरस्कारासंबंधी अधिक माहिती व अर्ज केंद्र शासनाच्या www.yas.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यांनी विहित नमुन्यात प्रस्ताव दोन प्रतीत 1 जुलै, 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए विंग, श्री. छात्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.