जळगाव लाईव्ह न्यूज । All Ministers With Shinde। शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोडल्यास शिवसेनेचे इतर सर्व मंत्री हे आता एकनाथ शिंदेवासी झाले असून त्यांनी बंडाचे हत्यार उगारले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व बंडामुळे शिवसेना चांगलीच हादरली आहे. शिंदे गटाने वापरलेला हा फॉर्मुला कधीच याआधी कोणीही वापरला नव्हता. यामुळे या बंडखोरीने शिवसेना हादरली आहे.बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात. मात्र दुसरीकडे शिवसेनेला पुन्हा झटका बसला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री गेले आहेत. षिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बंड केले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही.
बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत.शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सोडल्यास इतर सर्व मंत्री हे आता एकनाथ शिंदेवासी झाले असून त्यांनी बंडाचे हत्यार उगारले आहे.
आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जोडले जात आहे. आधी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे हे शिंदे गटाला मिळाले आहेत. आता उच्च – शिक्षण मंत्री उदय सामंत जे रत्नागिरीचे आमदार आहेत ते देखील या गटाला मिळाले आहेत. उदय सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येते आहे.