⁠ 
सोमवार, मे 6, 2024

चाळीसगावच्या अनुष्काला अमेरिकेच्या विद्यापीठाची सव्वादोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

चाळीसगाव तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या अनुष्का कुमावत या बारावीच्या विद्यार्थिनीला अमेरिकेच्या प्रसिद्ध ओहायो वेसलियान विद्यापीठाची सव्वा दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. अनुष्का बारावी नंतर आता या विद्यापीठात खगोलशास्त्र व आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पदवी घेणार आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे.

अस्ट्रोनोमी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सांगड घालून मानव कल्याणासाठी नवीन संशोधन करण्याचा तिचा मानस आहे. तामसवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या भोसरी येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या शरद कुमावत यांची ती मुलगी आहे. प्रतिकूल परिस्थितीत सतत १८ १८ तास अभ्यास करून तिने हे यश संपादन केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

अनुष्का अमेरिकेत शिक्षणासाठी जात आहे ही माहिती तामसवाडीत समजताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.