---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

लाचखोर पोलीस : गुन्ह्यात मदतीचा केला बहाणा, चहा टपरीवर स्वीकारली ४ हजारांची लाच!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । पतीसह सासरच्या मंडळींनी अगोदरच मुलीचा छळ केला होता. पोलिसात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा तर दाखल केला पण तपास थंडबस्त्यात गेला. गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू तसेच चार्जशीट लवकरात लवकर पाठविण्याचा बहाणा करीत सहाय्यक फौजदाराने ४ हजारांची लाच मागितली तर पोलीस नाईकने त्याला प्रोत्साहन दिले.चाळीसगाव शहरातील सिग्नल पॉईंटजवळील चहा टपरीवर मंगळवारी सायंकाळी लाच स्वीकारताना एसीबीने सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुसक्या आवळल्या. (Anti Corruption Trap)

anti corruption trap jpg webp

चाळीसगाव येथील तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे सासरच्या मंडळी विरुद्ध गु.र.नं.०११३/२०२२ भादवि कलम-४९८ अ व इतर कलमान्वये दि.१९ मार्च रोजी रोजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२ आणि पोलीस नाईक शैलेष आत्माराम पाटील, वय-३८ यांनी ५ हजारांची मागणी केली होती. तडजोड अंतर्गत पंचासमक्ष ४ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. अहिरे यांनी लाचेची मागणी करताना शैलेश पाटील याने त्यास प्रोत्साहन दिले.

---Advertisement---

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावकडे तक्रार केली. मंगळवारी पथकाने सापळा लावला असता लाचेची रक्कम दोन्ही कर्मचारी हजर असतांना अनिल अहिरे यांनी स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष स्वीकारली. पथकाने लागलीच त्यांना ताब्यात घेतले आणि याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा यशस्वी करण्यासाठी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदीप पोळ यांच्या पथकाने परिश्रम घेतले.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---