पुन्हा भाजपाला धक्का.. भडगाव शहराध्यक्षा सीमा महाजन यांचा शिंदे गटात सहकारी महिला पदाधिकाऱ्यांसह प्रवेश!

सप्टेंबर 29, 2022 4:48 PM

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । पाचोरा-भडगाव मतदारसंघात आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिंदे गटात प्रवेश असुन नुकत्याच आ. किशोर पाटील यांनी भडगाव शहरात भाजपाला पुन्हा धक्का दिला आहे. भाजपा महिला आघाडीच्या भडगाव शहराध्यक्षा सीमा महाजन यांनी शिंदे गटात सहकारी महिला पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला.

jalgaon 2022 09 29T164623.337 jpg webp

आ. किशोर पाटील यांच्या ‘शिवालय’ निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, भडगाव शहर प्रमुख योगेश गंजे, महेंद्र ततार, नितीन महाजन, राहुल महाजन, बंटी तहसीलदार, प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती. दरम्यान सीमा महाजन यांचे सोबत भडगाव शहरातील मेनका महाजन, रत्ना पाटील, आश्विनी सातव, श्वेता ततार, मीना महाजन आदींनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

Advertisements

आगामी काळात भडगाव शहरासह तालुक्यातील महिलांचे सक्षम संघटन अधिक मजबुत करत लोकाभिमुख कामे करून जनतेच्या मनात शिंदे गटा विषयी विश्वास निर्माण करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त करत सर्वांचे शिंदे गटात स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र ततार यांनी तर उपस्थितांचे आभार नितीन महाजन यांनी मानले .

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now