वाणिज्य

भारतातील असेही एक रेल्वे स्टेशन ; जिथे जाण्यासाठी लागतो व्हिसा आणि पासपोर्ट..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले असून दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे हजारो गाड्या चालवत आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नाही हे सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात एक रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज लागते. त्याशिवाय तुम्ही या स्थानकात प्रवेश देखील करु शकत नाही. पाहा कोणते हे रेल्वे स्थानक आहे ?

भारतीय रेल्वेच्या पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानकात जाण्यासाठी व्हीसाची आवश्यकता लागते. तसेच या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची गरज लागते. तुम्हाला वाटेल की जर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेचे आहे. तर तेथे जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची का आवश्यकता आहे ?

याचे कारण म्हणजे अटारी रेल्वे स्थानकातून पाकिस्तानसाठी ट्रेन जाते. त्यामुळे या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानाच्या परवानगीची गरज लागते. जर तुम्ही अटारी रेल्वे स्थानकात विना पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय प्रवेश केला. तर पकडल्यानंतर तुम्हाला 14 फॉरेन एक्ट म्हणजे व्हीसाच्या इंटरनॅशनल हद्दीत बेकायदा शिरकाव केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अटक देखील होऊ शकते.

बंद झाले स्थानक
अटारी रेल्वे स्थानकातून एकमेव समझौता एक्सप्रेस चालत होती. या ट्रेनच्या तिकीटासाठी तुम्हाला पासपोर्ट दाखवावा लागतो. जर ही ट्रेन लेट झाली तर पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश रजिस्टरमध्ये ट्रेन एण्ट्री लिहीतात. 8 ऑगस्ट 2019 रोजी या रेल्वे स्थानकाला बंद करण्यात आले आहे. त्यानंतर समझौता एक्सप्रेसला देखील बंद करण्यात आले आहे. या समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button