⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | गुन्हे | जळगाव जिल्ह्यातील आणखी एक अट्टल गुन्हेगार स्थानबध्द

जळगाव जिल्ह्यातील आणखी एक अट्टल गुन्हेगार स्थानबध्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना जबर चपराक देण्याचे काम पोलीस प्रशानाकडून सुरु असून जिल्ह्यातील आणखी एका गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. विशाल चौधरी (रा. अमळनेर) असं स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

झामी पोलीस चौकी परिसरातील विशाल दशरथ चौधरी, वय-२७ वर्ष याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सन २०१६ पासून ते सन २०२३ च्या ३१ जुलै पावेतो अनेक गुन्हेगारी कृत्य केले. त्यात प्रामुख्याने बनावट विषारी दारू विकणे, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, लुटमार करून जबर दुखापत करणे तसेच समाजात गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणे आणि विशेषता हिंदू मुस्लिम जातीय तणाव निर्माण करून दंगल घडविणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.

अधिनियम १९८१ प्रमाणे विशाल दशरथ चौधरी यास पुणे येथील येरवडा सेंट्रल तुरुंगात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, पोलीस अमलदार किशोर पाटील, डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, सुनिल रामदास पाटील, घनशाम पवार, कैलास शिंदे, जितेंद्र निकुंभे, चालक मधुकर पाटील, योगेश श्रावण पाटील, सुनिल बभूता पाटील यांनी कामगिरी बजावली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.