जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या जळगावसह महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 या तारखेला होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे.

निवडणुकीच्या घोषणेमुळे आता २९ पालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्याने राजकीय पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

निवडणूक कार्यक्रम –

उमेदवारी अर्ज स्वाकीरणे – २३ डिसेंबर – ३० डिसेंबर
छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप – अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
मतदान – १५ जानेवारी २०२६
निकाल – १६ जानेवारी २०२६










