जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । आगामी नगरपालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर पक्षाचे उपाध्यक्ष विनायक भोईटे हे जिल्हा दौर्यावर आले होते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ते संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात दिशा ठरवण्यात आली. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच काही कार्यकर्त्यांची उचलबांगडी देखील करण्यात आली आणि ज्या कार्यकर्त्यांची कामे उल्लेखनीय होती त्यांचे कौतुक देखील करण्यात आले.
चाळीसगाव शहरात आण्णा विसपुते यांचे पक्षासंदर्भात काम उत्तम रित्या आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा चाळीसगाव शहराच्या शहरप्रमुख म्हणून बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. तसेच तालुकाअध्यक्ष म्हणून संग्रामसिंग शिंदे यांची निवड झाली. विसपुते यांचे उपाध्यक्षांनी तोंडभरून कौतुक केले व आगामी नगरपालिका निवडणुकीत चाळीसगावातील सर्व 34 वार्ड मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले उमेदवार उभे करणार आहेत असे देखील या बैठकीत जाहीर करण्यात आले.