⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग गेला खड्ड्यात ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग गेला खड्ड्यात ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर यावल ते चोपडा दरम्यान या महामार्गाची फारच दयानिय अवस्था झालेली. यामुळे अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवितांना लहान मोठे अपघात होत आहेत. यात अनेक निरपराध नागरीकांना आपला जिव गमवाव लागत आहे. याकडे राज्य महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देवुन हा धोकादायक रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

यावल शहरातुन जोडला गेलेला बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग असुन मागील वर्षापासुन या मार्गावर परप्रांतीय अवजड वाहनांच्या वाहतुकीची संख्या वाढलेली आहे.यात या महामार्गावर यावल ते चोपडा पर्यंत सुमारे ४५ किलोमिटर दरम्यानच्या मार्गावरील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे.”रस्त्यात खड्डा की खडड्यात रस्ता” हे सांगणेच कठीन अशी या महामार्गाची परिस्थिती झालेली आहे.

सदरील महामार्ग राज्य महामार्गाकडे चौपदरी करणासाठी वर्ग करण्यात आलेला आहे.तसेच लोकप्रतिनिधींचेही या महामार्गाकडे दुर्लक्ष होत आले.तरी संबंधी लोकप्रतिनिधी व राज्य महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष पुरवुन या राज्य महामार्गाची दुरुस्ती करून अपघातामुळे होणारी वाहनधारकांची जिवीत हानी टाळवी अशी मागणी वाहनधारकांची वतीने करण्यात आलेली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.