जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । शेतातील गोठ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्ब्ल १३ शेळ्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच असल्याने आता चोरट्यांवर नेमका आळा घालावा तरी कसा ? प्रश्न निर्माण झालाय.
ही घटना तालुक्यातील पाथरी येथे घडलीय. येथील रहिवासी अभिमन धनगर (वय ६०) यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल १३ शेळ्या चोरून नेल्या, हा प्रकार १७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास उघडीस आला. या प्रकरणी अभिमन धनगर यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी एपीआय अमोल मोरे यांनी भेट दिली, त्यानुसार अनोळखी भामट्याविरुद्द भा, कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र उगले करीत आहे.