माझे मंत्रीपद चार महिन्यासाठी असो की..; मंत्री अनिल पाटीलांचा खडसेंवर सणसणीत टोला
जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील हे केवळ चार महिन्यासाठी आमदार आहेत, पुन्हा निवडून येतील की नाही अशी टिका केली होती. आता यावरून मंत्री अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंवर टोला हाणला आहे.
माझे मंत्रीपद चार महिन्यासाठी असो की, चार दिवसांसाठी असो माझ्या मतदारसंघातील जनतेमुळे मला मंत्रीपद मिळाले याचा अभिमान आहे. परंतु तुम्ही ज्या साडेचार वर्षे बाकी असलेल्या आमदारकीचा अभिमान मिरवित आहात. ती आमदारकी तुम्हाला माझ्या मतामुळे मिळाली आहे. माझ्या आमदारकीत मात्र तुमचे योगदान शून्य आहे असा सणसणीत टोला अनिल पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
भारतीय जनता पक्षात खडसे यांना कोणीही विचारीत नव्हते, त्यावेळी ते आपल्याकडे राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षात घेण्याबाबत वरिष्ठांना सांगावे असा आग्रह करीत होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातही अनेकांचा विरोध असतांना मी वरिष्ठांना आग्रह करून त्यांना राष्ट्रवादी पक्षात घ्यायला लावले. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली, त्यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी मी व अजितदादा पवार यांनी प्रयत्न केले. आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलो व मतदान करून घेतले.